Tuesday, September 15, 2009

मरहट्टे

"अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तैसा घाला घालावा, शिपाईगिरीची शर्थ करावी, प्रसंग पडल्यास माघारे पळुन जावे. खाण्यापिण्याच्या दरकार बाळगीत नाहित. पाऊस, ऊन, थंडि, अंधारी काहि न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुल्कात फौज आली म्हणोन त्यांजवर रवानगि करावि तो दुसरेकडे जाऊन ठाणी घेतात, मुलुख मारीतात, हे आदमी नव्हत भूतखाना आहे."


- मराठ्यांच्या गनिमी युध्दतंत्राविषयी शत्रुंचा अभिप्राय कसा होता? त्याचे मल्हार रामराव चिटणीस बखरीत केलेले वर्णन.(म.वि.को. खंड ४)

No comments: